ठळक घडामोडी

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार उद्या सिंधुदुर्गात!

मालवण : प्रतिनिधी
    संतपरंपरेच्या पावन आशीर्वादाने समाजप्रबोधन, धर्मसंरक्षण आणि हिंदू समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासावर येत असून, या प्रवासादरम्यान संतसमाजाशी सुसंवाद साधण्यासाठी संत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री आनंद प्रभू यांनी दिली.
     हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा परिसरातील सर्व साधू संत, महंत, धर्माचार्य, कीर्तनकार व प्रवचनकार तसेच धर्मप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी वेळ सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत स्थळ शांतादुर्ग मंगल कार्यालय पावशी (ता. कुडाळ) या ठिकाणी उपस्थित राहून या संत संवाद कार्यक्रमास आपल्या पावन उपस्थितीने व मार्गदर्शनाने गौरवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
    यावेळी परम पूज्य दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज , वेद मूर्ती रामचंद्रजी मुंडले, वारकरी सांप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष मा . ह .भ .प . विश्वनाथ गवंडळकर व नारदीय कीर्तनकार संघाचे जिल्हा अध्यक्ष  संजय पुनाळेकर उपस्थित राहाणार आहेत.सानिध्यातून समाजाला योग्य दिशा मिळते आण ि धर्मसंस्कार दृढ होतात, या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आपल्या पावन उपस्थितीमुळ े हा कार्यक्रम निश्चितच अधिक प्रेरणादायी आण ि यशस्वी ठरेल, असा आम्हाला विश्वास असल्याचेही आनंद प्रभू यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!