ग्राम महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी
नवीन ग्रा.पं. इमारतीत तलाठी कार्यालय सुरू
कुडाळ : प्रतिनिधी
हुमरमळा (वालावल) येथील ग्राम महसुल अधिकारी पुजा भोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पंचायत समिती सदस्या सौ अर्चना अतुल बंगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
हुमरमळा-वालावल ग्रामपंचायत इमारत पूर्ण झाल्यानंतर तलाठी कार्यालय आता याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी स्वतंत्र सजा असतानाही जागेअभावी तलाठी कार्यालय पाट येथूनच कार्यरत होते. मात्र आता गावातच कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्राम महसुल अधिकारी पुजा भोरे यांनी अभियान काळात उत्पन्न दाखले, वारस नोंदी, संजय गांधी निराधार योजना आदी कामांना गती देत उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. यावेळी अतुल बंगे, ग्राम पंचायत अधिकारी अपर्णा पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश मयेकर आदी उपस्थित होते. तसेच तलाठी कार्यालयासाठी आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी सौ.बंगे यांनी तलाठी कार्यालयाला कपाटही भेट दिली. तसेच तलाठी कार्यालयामार्फत गावातील नागरिकांना सातत्याने व तत्पर सेवा देण्याचे आवाहन केले.









