ठळक घडामोडी

योगियांचे योगी प. पू. भालचंद्र महाराजांचा उद्या जन्मोत्सव!

विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक

भाविकांची अलोट गर्दी; कणकवलीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली

कणकवली : प्रतिनिधी
     योगियांचे योगी प. पू. भालचंद्र महाराज यांचा १२२ वा जन्मोत्सव उद्या गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक साजरा होणार आहे. सायंकाळी भालचंद्र महाराज यांची शहरातून पालखी मिरवणूक निघणार आहे. जन्मोत्सवानिमित्त गेले चार दिवस संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे.
      जन्मोत्सवामुळे कणकवलीनगरी भक्त रसात न्हाऊन निघाली आहे. गुरुवार ८ रोजी भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पहाटे ५.३० वा. काकड आरती, समाधीपूजा, जपानुष्ठान, सकाळी ८ वा. भजने, ९ वा. समाधीस्थानी लघरुद्र, ९.३० वा. ह. भ.प. भाऊ नाईक यांचे जन्मोत्सावर कीर्तन, दुपारी १२ वा. प.पू.भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, १२.३० वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. प.पू. भालचंद्र महाराज यांची शहरातून घोडे, वारकरी मंडळीच्या समवेत पालखी मिरवणूक निघणार आहे. रात्री १२ वा. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तृत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा  ट्रिकसीनयुक्त गज वज्रकाय संगम हा प्रयोगाने जन्मोत्सावाची सांगता होणार आहे. भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गेले चार दिवस संस्थान परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील कानाकोप-यातील भक्तगण कणकवली दाखल झाले आहेत. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामुळे भालचंद्र महाराज यांचे रुप भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. या महोत्सवामुळे कणकवलीनगरीत भक्तिमय वातावरण आहेत. विशेष म्हणजे भालचंद्र महाराज यांच्या यंदाचा जन्मोत्सव त्यांच्या जन्म दिन व तिथीनुसार असा योग जुळून आला आहे.

error: Content is protected !!