ठळक घडामोडी

पावशी जि.प.त दादा साईल यांच्या प्रचाराचा झंझावात.. महायुतीच्या विकासदृष्टीला जनतेची साथ!

‘विकास आणि विश्वास’च्या जोरावर दादा साईल, निखिल कांदळगावकरांचा घरोघरी प्रचार

कुडाळ : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार तुकाराम (दादा) चंद्रकांत साईल यांनी झंझावाती प्रचार करत संपूर्ण मतदारसंघात विकासाचा नवा उत्साह निर्माण केला आहे. ‘घेऊ भरारी पुन्हा…! ही प्रभावी टॅगलाईन घेऊन त्यांनी जनतेला विकासाच्या नव्या पर्वासाठी एकत्र येण्याचे भावनिक आवाहन केले आहे.
       निवडणूक ही सत्तेची नव्हे, तर जनतेच्या विश्वासाची लढाई असते,असे ठाम मत व्यक्त करत दादा साईल यांनी मतदार, कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या शाश्वत विकासाच्या स्वप्नाशी असलेली नाळ अधोरेखित केली. जिल्ह्यात शाश्वत विकासाची पायाभरणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केली असून, त्याच दूरदृष्टीला पुढे नेत आज पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आमदार निलेश राणे सक्षम नेतृत्व करत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी आणून रस्ते, आरोग्य, शिक्षण व रोजगार क्षेत्रात ठोस कामे झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
      दादा साईल यांनी जाहीरनाम्यातून पावशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा जनतेसमोर मांडला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करणे, डिजिटल वर्गखोल्या, संगणक प्रशिक्षण, गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि शाळा गळती रोखण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे, गावोगावी मोफत आरोग्य शिबिरे, माता–बाल आरोग्यावर विशेष भर आणि २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
      प्रत्येक गावाला शुद्ध पिण्याचे पाणी, जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छ गाव–सुंदर गाव अभियान, कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा, पीक विमा, शासकीय योजनांचा थेट लाभ, शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी बाजारपेठ सुधारणा, तसेच महिला बचत गट, स्वयंरोजगार योजना आणि युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा संकल्पही त्यांनी मांडला आहे. सर्व गावांना पक्के रस्ते, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, आधुनिक पायाभूत सुविधा व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचाही महायुतीच्या अजेंड्यात समावेश आहे.
       भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन हेच आमचे ध्येय आहे. जनता आणि प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद ठेवून काम केले जाईल,” अशी ग्वाही देत दादा साईल यांनी महायुतीला भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मतदारसंघात मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, महायुतीचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, जि.प. उमेदवार दादा साईल व डिगस पंचायत समिती उमेदवार निखिल कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी आमदार निलेश राणे स्वतः मैदानात उतरले. डिगस, पणदूर, अणाव, सोनवडे, पावशी आदी भागांत घेतलेल्या बैठकीत त्यांनी जनतेशी थेट संवाद साधत महायुतीच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

error: Content is protected !!