ठळक घडामोडी

सिंधुदुर्गात ‘आदर्श होळी उत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा!

सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीचा संयुक्त पुढाकार

कुडाळ, सावंतवाडी, शिरोडा येथे विधिवत पूजन; शेकडो धर्माभिमानींची उपस्थिती

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
       हिंदु जनजागृती समिती (सिंधुदुर्ग)च्या वतीने रविवारी सायंकाळी कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले – शिरोडासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘आदर्श होळी उत्सव’ साजरा करण्यात आला.
     होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. कोकणात होळी हा सण प्रत्येक गावात, शहरात साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व ठिकाणी होळी मोठ्या उत्साहात साजरा झाला. 
    हिंदूंचे धार्मिक सण – उत्सव  आदर्श रीत्या कसे साजरे करावेत या बाबत हिंदूंना प्रभोधन व्हावे यासाठी सनातन संस्था आणि हिंदुजनजागृती समिती यांनी संयुक्त रित्या जिल्ह्यात दोन ठिकाणी आदर्श होळीउत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा केला. सावंतवाडी, कुडाळ, या ठिकाणी मोट्या संख्येने सनातन संस्थेचे साधक हिंदुजनजागृतीचे कार्यकर्ते असेच धर्माभिमानी हिंदु  उपस्तित होते.
    यावेळी कुडाळ, आणि सावंतवाडी येथे सनातनचे संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सावंतवाडी येथे श्री देव नारायण मंदिर समोरील भागात होळीचे पूजन काण्यात आले. यावेळी कोलगाव येथील धर्मप्रेमी रवी भिसे यांनी पूजन केले तर पुरोहित म्हणून श्रीपाद काशाळीकर यांनी विधिवत पूजा केली.
यावेळी १०० हुन अधिक सनातनचे  साधक, हिंदुजनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते.
     कुडाळ येथील पोस्ट ऑफिस समोरील मैदानावर
श्री नामदेव सावंत यांनी पूजन केले तर पुरोहित नेरूर येथील श्री.मंजुनाथ सुभाष फडके पूजन यांनी केले.
      वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील विजय केरवाडा मैदान, येथे होळीचे पूजन येथील धर्मप्रेमी श्री. भालचंद्र कुबल यांनी पूजन केले. तर पुरोहित श्री. हर्षद वझे यांनी विधिवत पूजन केले.

error: Content is protected !!