ठळक घडामोडी

सावंतवाडी उपनगराध्यक्षपदी भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर विजयी

स्वीकृत नगरसेवकपदी ॲड. सिद्धार्थ भांबुरे व ॲड. नीता सावंत – कविटकर यांची निवड

सावंतवाडी : प्रतिनिधी
     सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे ॲड. अनिल निरवडेकर विजयी झाले. त्यांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे यांचा पराभव केला. तर स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे ॲड. सिद्धार्थ भांबुरे आणि शिवसेनेच्या ॲड. नीता सावंत-कविटकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
       या निवडणूक प्रक्रियेत ॲड. अनिल निरवडेकर यांना १२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अजय गोंदावळे यांना ७ मते मिळाली. भाजपची ११ मते आणि नगराध्यक्षांचे १ मत अशा बळावर अॅड. निरवडेकर यांनी विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, राष्ट्रीय काँग्रेसचे आणि ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक या मतदानादरम्यान तटस्थ राहिले.
    अॅड.निरवडेकर विजयी होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तसेच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले, संजू परब, बाबू कुडतरकर आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अॅड.निरवडेकर यांनी सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करणे आणि पक्ष संघटना मजबूत करणे हेच आपले ध्येय असल्याचे यावेळी सांगितले.

error: Content is protected !!