ठळक घडामोडी

कुडाळ एमआयडीसीत परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!

राहत्या खोलीत मृतदेह आढळला; पोलिस तपास सुरू

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ एमआयडीसी परिसरात एका परप्रांतीय तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
    मृत युवक अंदाजे २२ वर्षांचा असून, तो काही दिवसांपूर्वी कामानिमित्त कुडाळ येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता. तो येथील एका कंपनीत काम करत होता. मात्र सोमवारी सकाळी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

error: Content is protected !!