खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती
जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन
जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते–खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते – आमदार भास्कर जाधव, उपनेते जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे उद्या मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक सकाळी ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे होणार आहे. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हयातील होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा ते आढावा घेणार आहेत.तसेच यावेळी जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी आमदार परशुराम उपरकर,माजी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी केले आहे.







