ठळक घडामोडी

दोडामार्ग–विजघर रस्ता रुंदीकरणाला विरोध खपवून घेणार नाही – गणेशप्रसाद गवस

विकास कामात अडथळे आणणाऱ्यांचा स्वार्थी डाव हाणून पाडू

सात दिवसांत अधिकारी – नागरिकांची संयुक्त बैठक; प्रश्न सोडवण्याचा निर्धार

दोडामार्ग : प्रतिनिधी
      दोडामार्ग ते विजघर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एका बाजूने तालुक्याचा विकास सुरू असताना दुसऱ्या बाजूने मात्र विरोधक फक्त आर्थिक स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ते वारंवार रस्त्याचे काम अडवत असून ठेकेदारांच्या कामगारांमध्ये भिती निर्माण करत आहेत. त्यांचा हा प्रकार निषेधार्थ असून ते कदापीही खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशारा शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी नाव न घेता विरोधकांना दिला आहे.
       दोडामार्ग मधील शिंदे शिवसेना कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोबत उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, गुरूदास सावंत, तालुका संघटक गोपाळ गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, शहरप्रमुख शीतल हरमलकर व पदाधिकारी उपस्थित होते.
     श्री. गवस म्हणाले, रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला असून सध्या काम प्रगतीपथावर आहे. मात्र विरोधकांकडून आर्थिक स्वार्थापोटी काम रोखण्याचे, आंदोलन व धमक्या देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप श्री. गवस यांनी केला. कामात अडथळे आल्यास त्याचा फटका जनतेला बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकास कामात अडथळे आणणाऱ्यांचा स्वार्थी डाव हाणून पाडू, असा इशारा देत येत्या सात दिवसांत संबंधित अधिकारी, नागरिक व लोकप्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!