२९ डिसेंबरला आयएएस अधिकारी दत्तप्रसाद शिरसाट यांचे प्रेरणादायी व्याख्यान
नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरासह संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयएएस–आयपीएस व विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. “मार्गदर्शन भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, चला कुडाळ घडवूया!” या टॅगलाईनखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वात सोमवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२.३० कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे कुडाळचे सुपुत्र व आयएएस अधिकारी दत्तप्रसाद सूर्यकांत शिरसाट यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी ते थेट संवाद साधणार असून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांसाठी हा कार्यक्रम खुला आणि पूर्णपणे विनामूल्य आहे, अशी असल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमाच्या पुढील पर्वात खगोलशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, इस्रो–नासा संदर्भातील संधी, तसेच आयएएस–आयपीएस, मेडिकल, इंजिनिअरिंग आणि लॉ साठी मॉक टेस्ट व विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार असल्याचे नगरसेवक श्री. शिरसाट यांनी सांगितले. तरी कुडाळ शहरासह संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी या प्रेरणादायी संधीचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन मंदार शिरसाट यांनी केले आहे. यावेळी संदीप म्हाडेश्वर व अमित राणे उपस्थित होते.







