ठळक घडामोडी

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात विविध उपक्रमांची रेलचेल!

राज्यस्तरीय बुद्धिबळ व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांसह अनेक कार्यक्रम

कुडाळ भाजपचे आयोजन; तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
      कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दि.10 एप्रिल रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
     गुरवार दि. 9 एप्रिल रोजी हळदीचे नेरूर येथील श्री देव जटाशंकर मंदिर येथे लघुरुद्र व महाप्रसाद तसेच 10 एप्रिल रोजी कलेश्वर मंदिर, नेरूर येथे अभिषेक करून कार्यक्रमांचा शुभारंभ होईल. कुडाळ मध्ये पालकमंत्री श्री. नितेश राणे, कुडाळ मालवणचे आमदार श्री. निलेश राणे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा तसेच सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत एकूण 300 स्पर्धक सहभागी होतील. प्रथम पाच विजेत्यांना रोख बक्षिसे व आकर्षक चषक तसेच पहिल्या 30 स्पर्धेकांना रोख रक्कमेची बक्षिसे व मेडल्स देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंन आकर्षक टी शर्ट आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय इतर उत्तेजना बक्षीसामध्ये 8 वर्षे ते 17 वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
    बुद्धिबळ स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी सहित कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बेळगाव, गोवा येथील अनेक आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून श्री. उमेश नाईक, फिडे ऑरबिटर गोवा हे काम पाहतील. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्ह्यास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. कॅरम स्पर्धेत एकूण 100 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकासाठी रोख रक्कम व चषक तसेच इतर अनेक उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग व गोवा येथील नामवंत पंच स्पर्धेसाठी उपलब्ध असतील. स्पर्धेचे मॉनिटरिंग डिस्ट्रिक्ट असोसिएशचे श्री. योगेश फणसळकर करतील.
    बु‌द्धिबळ व कॅरम या दोन्ही स्पर्धा श्री महालक्ष्मी हॉल कुडाळ, हॉल नंबर 1 व 2, येथे दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 8.00 ते सायं. 5.50 वा. पर्यंत संपन्न होतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी बु‌द्धिबळ स्पर्धेसाठी श्री. श्रीकृष्ण आडेलकर, मो. न. 9422381949 तर कॅरम स्पर्धेसाठी श्री. योगेश फणसळकर मो. नं. 7620755766 यांच्याशी संपर्क करावा. खासदार श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे वर्षभर प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या कलाक्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमामध्ये तसेच शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी होणाऱ्या बुद्धिबळ व कॅरम स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने भाजपा कुडाळ अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!