ठळक घडामोडी

डिगस पं.स. मतदारसंघात निखिल कांदळगावकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

युवावर्गाचा मोठा पाठिंबा; डोअर टू डोअर प्रचाराला वेग

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील डिगस पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना – महायुतीचे उमेदवार निखिल कांदळगावकर यांच्या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विशेषतः युवावर्गाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
      डिगससह संपूर्ण मतदारसंघातील गावांमध्ये निखिल कांदळगावकर यांनी प्रचार फेरी काढत डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला आहे. मतदारांच्या थेट संपर्कातून विकासाची भूमिका मांडत ते मतदारांशी संवाद साधत आहेत. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले असून, संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी डिगस गावात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदारसंघातील सर्वच ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मतदारांचा वाढता विश्वास आमच्या बाजूने असल्याचे निखिल कांदळगावकर यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!