ठळक घडामोडी

पिंगुळी-कुडाळच्या कु.आरव आईरला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार!

कोकणात चित्रित ‘केकी’चे फिल्म फेस्टिव्हलमध्ये घवघवीत यश

दोडामार्ग, वेंगुर्ले आणि कुडाळ येथे झाले चित्रिकरण

कुडाळ : प्रतिनिधी
     पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये कोकणात चित्रित झालेल्या ‘केकी’ या शॉर्टफिल्मने उल्लेखनीय यश संपादन करत तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार पिंगुळी – कुडाळ येथील कु. आरव सुरेश आईर याला देण्यात आला. लहान वयातच आरवने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या तसेच परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्याचबरोबर उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विठ्ठल काळे यांना, तर बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार प्रथमेश रंगोले यांना मिळाला.
     ‘केकी’ या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण कोकणातील झोळंबे (दोडामार्ग), किल्लेनिवती (वेंगुर्ले) आणी वालावल (वालावल) या ठिकाणी करण्यात आले आहे. स्थानिक पार्श्वभूमी, वास्तववादी कथा आणि प्रभावी मांडणीमुळे हा लघुपट प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारा ठरला आहे. कु. आरव आईर याने यापूर्वीही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत अटल करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर करंडक एकांकिका स्पर्धा तसेच विविध शॉर्टफिल्म स्पर्धांमध्ये उत्कृष्ट बालकलाकार आणि खुल्या गटात उत्कृष्ट पुरुष कलाकार असे पुरस्कार मिळवले आहेत. याशिवाय झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अंधारमाया’ या लोकप्रिय वेबसिरीजमध्ये त्याची प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
     अलीकडेच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते अभिजीत केळकर आणि बिग बॉस फेम अभिनेत्री योगिता चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘शंकराचा बाळ आला’ हा व्हिडिओ अल्बम वैशाली माडे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला. या गाण्याला प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी आवाज दिला असून, या अल्बममधील आरवची भूमिका प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुकास्पद ठरली.
    ‘केकी’ या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन तुषार उदेग यांनी केले असून निर्माते निखिल सोनावणे आहेत. सहनिर्माते म्हणून प्रथमेश रंगोले आणि तुषार उदेग यांनी जबाबदारी सांभाळली आहे. यात कलाकार वासु – आरव आईर, सूर्या – विठ्ठल काले, आजोबा – विवेक वालके, वासु आई – शुभदा टिकम, गिर्या – हर्षद परब, गिर्या आई – पुजा राणे, बालपनीचे आजोबा – आयुष चव्हाण, बालपनीचा सूर्या – विकास तारपे, विन्या – सोहम कुड़ालकर, अण्णा – राजेश नाईक, राक्षस – अनिरूद्ध जंभावडेकर, हित्या – किशोर तेंडूलकर, पाटील – मंगेश डोंगरे यांच्या भूमिका आहेत.

error: Content is protected !!