ठळक घडामोडी

मुळदेतील शेतात गावठी बॉम्बचा स्फोट!

शेतकरी गंभीर जखमी; गोव्याला हलविले

कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील मुळदे परिसरात शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घरालगत असलेल्या शेतात अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने सुमारे ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला. स्फोटाचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली.
    जखमी शेतकऱ्याला तात्काळ कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. कदम हेही उपस्थित होते. याबाबत कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!