तुळसुलीत बाळूमामा देवस्थान कमिटीकडून शाल, श्रीफळ व मानाची घोंगडी प्रदान
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा मतदार संघाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा तुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे सत्कार करण्यात आला. जि.प. निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान कमिटी रांगणातुळसुली यांच्या वतीने हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी रामदास तेंडोलकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन पावसकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्री. वरक व श्री. तांडेल यांच्या वतीने मानाची घोंगडी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









