
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग येथील लक्ष्मीबार्ई सिताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सध्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु आहे. “सारी डे” चे औचित्य साधून मराठी विभाग व मराठी भाषा वाङमय मंडळाच्या वतीने काव्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मराठी विभागाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी परशुराम कदम हिने कोकणाचो पावस या मालवणी कवितेचे प्रभावी काव्यसादरीकरण करून प्रथम क्रमाक मिळविला. कु. प्रीती रघुनाथ जाधव हिने द्वितीय तर कु. वैष्णवी शंतनू साळगावकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. केतन शिवराम मोर्लेकर हा उत्तेजनार्थ ठरला. यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धेदरम्यान प्रेम, निसर्ग व जीवन विषयक कवितांचे सादरीकरण करण्यात आले. काही विद्यार्थ्यानी स्वतःच्या जीवनानूभवांवर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. “सारी डे” चे औचित्य साधून विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेंसाठी परीक्षक म्हणून डॉ. प्रशांत ढेपे आणि प्रा. सदाशिव चुकेवाड यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान जाधव, प्रा. डॉ. गाथाडे, डॉ. दरेकर तसेच मराठी विभागप्रमुख प्रा. दिलीप बर्वे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्याच्या साहित्यिक गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्रध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कदम हिने तर आभार कु. प्रीती जाधव हिने मानले.








