ठळक घडामोडी

कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलचे यश!

कुडाळ : प्रतिनिधी
    पाटकर–वर्दे कॉलेज यांच्या वतीने आयोजित कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. या कला उत्सवामध्ये पेंटिंग, वेशभूषा, अभिनय, रिल्स मेकिंग तसेच निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच कलाप्रकारांमध्ये पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळविले.
    या स्पर्धांमध्ये ऋग्वेद कुसाजी कांबळी याने प्लेट पेंटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अथर्व जगदीश गोसावी याने रिल्स मेकिंग स्पर्धेत प्रथम, तर सोहनी संदीप साळसकर हिने रिल्स मेकिंगमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. दीक्षा दिनेश मराळ हिने एकपात्री अभिनय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. निबंध लेखन स्पर्धेत गौरी ज्ञानेश्वर राणे हिने प्रथम, तर भूमी कृष्णा गावडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट पंचक्रोशी तसेच विद्यालयाच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, कला शिक्षक संदीप साळसकर व शिक्षक प्रतिनिधी विजय मेस्त्री यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धांसाठी शिला सामंत यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!