वाडीवरवडे येथे अपघात; युवती जखमी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज सायंकाळी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील युवतीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३ वाजता सुटलेली कुडाळ-मठ वेंगुर्ला ही एसटी बस वाडीवरवडे येथे आली असता मागून येणाऱ्या दुचाकीने बसला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील युवतीच्या पायाला दुखापत झाली. अपघातानंतर जखमी युवतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.









