रोख पारितोषिकांसह आकर्षक चषकांची रेलचेल
नोंदणीची अंतिम मुदत १० एप्रिल; आयोजकांचे आवाहन
मालवण : प्रतिनिधी
श्री देव भूतनाथ हॉलीबॉल संघ वायरी आयोजित सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 11 एप्रिल रोजी ही जिल्हास्तरीय व निमंत्रित संघांची स्पर्धा श्री देव भूतनाथ मंदिर नजीक च्या पटांगणावर संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी अनुक्रमे पहिल्या चार क्रमांकांना 7777, 5555, 2000, व 2000 अशी रोख रक्कमेची पारितोषिके आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे उत्कृष्ट शूटर उत्कृष्ट लिप्टर उत्कृष्ट नेट मन, उत्कृष्ट सर्विसमन तसेच शिस्तबंद संघ यांनाही आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व संघांना आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू होणार असून स्पर्धेसाठी इच्छुक संघाने आपली नाव नोंदणी 10 एप्रिल पर्यंत द्यावयाची आहेत. स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूस दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. दिलेल्या वेळेत संघ उपस्थित न राहिल्यास त्या संघाला बाद करण्यात येईल. काही नियम मंडळाकडे राखीव राहतील. सर्व संघांच्या रात्रीच्या जेवणाची सोय अकरा वाजेपर्यंत करण्यात येईल. असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे स्पर्धेसाठी मयूर कोळंबकर 9421370709, दीपक ढोलम7219670872, स्वप्नील केळुसकर 8600877283 यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.






