ठळक घडामोडी

लग्नानंतर नवरदेव पोचले थेट मतदान केंद्रावर!

माड्याचीवाडीतील प्रदिप खराडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी वरचीवाडी येथील प्रदिप गोपाळ खराडे यांचा शनिवारी विवाह सोहळा पार पडला. मात्र याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असल्याने, विवाहाच्या धावपळीतही त्यांनी लोकशाहीची जबाबदारी प्राधान्याने पार पाडली.
    सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे नाकेवाडी येथील नववधू शांती गवस यांच्यासोबत प्रदिप खराडे यांचा विवाह माड्याचीवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विवाहानंतर नवरदेव प्रदिप खराडे यांनी वऱ्हाडी मंडळी, ग्रामस्थांसह तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील माड्याचीवाडी मडगाव बुथ क्रमांक ३०/४ येथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. विवाहासारख्या खास क्षणीही मतदानाला दिलेले प्राधान्य उपस्थित मतदारांमध्ये प्रेरणादायी ठरले.

error: Content is protected !!