कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळ पासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रकिया पार पडणार आहे. ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









