ठळक घडामोडी

कुडाळमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा जागर!

शहरात जनजागृतीपर मोटारसायकल रॅली

बाल विकास प्रकल्प कार्यालय व पं.स. चे आयोजन

कुडाळ : प्रतिनिधी
       जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत कुडाळ येथे आज सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते पंचायत समिती दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीत महिला व पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
     रॅलीचा प्रारंभ राजमाता जिजाऊ चौक चौक येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती सीताराम तेली यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला. यावेळी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रफुल्ल वालावलकर (गटविकास अधिकारी), अभिजित कसालकर (तालुका पशुसंवर्धन अधिकारी), मृणाल कार्लेकर (सह प्रशासन अधिकारी), चंद्रसुभाष परब, खरात, संदेश परब, ललिता कासले, शर्मिला वळवी, अक्षय कानविंदे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!