ठळक घडामोडी

मांडकुली भोईवाडी–मळावाडी रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

ग्रामस्थांनी मानले वैभव नाईक यांचे आभार

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ तालुक्यातील मांडकुली मुख्य रस्ता ते भोईवाडी हायस्कूल मार्गे मळावाडी या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज (बुधवारी) माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ग्रामस्थ विजय परब यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
    या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे मांडकुली भोईवाडी, मळावाडी व परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांसह शेतकरी, कामगार व दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर निधी मंजूर झाल्याने लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
    या रस्ता कामाच्या शुभारंभावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, माजी सरपंच तुषार सामंत, धनवान खवणेकर, गोविंद अणसूरकर, चेतन सावंत, बाबी राऊळ, महादेव भोई, अमित तांबूळकर, उल्हास भोई, शशांक नार्वेकर, चैतन्य भोई, मानसी नार्वेकर, सुवर्णा माळगावकर, उषा भोई, सुनील पिंगुळकर, नामदेव भोई आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
    यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी निधी मंजूर केल्याबद्दल वैभव नाईक यांचे आभार मानले.

error: Content is protected !!