नवीन कार्यकारणीची निवड होणार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता महालक्ष्मी हॉल क्रमांक 2 येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार असून तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी आणि व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या सभेला विशेष महत्त्व आहे.
तरी कुडाळ तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.








