ठळक घडामोडी

माणगाव दत्त मंदिरात श्री मन्युसूक्त दत्तयाग भक्तिभावात सुरू

नामघोष, यज्ञ व पालखी सोहळ्याने परिसर दत्तमय

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिरात सन १९७२ पासून सुरू असलेल्या श्री गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त श्री मन्युसूक्त दत्तयाग सध्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. परमपूज्य श्री. प. प. नांदोडकर स्वामी यांनी सुरू केलेल्या या पवित्र परंपरेनुसार शुक्रवारपासून विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवारपासून अखंड नामस्मरणास प्रारंभ झाला असून भक्तांच्या तोंडी“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”हा नामजप अखंड सुरू आहे. रविवारी सायंकाळी महाआरती व पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला.
       रविवारी श्री दत्तप्रभूंच्या जन्मस्थान व समाधी स्थळी अभिषेक व पूजन, तसेच यज्ञमंडप देवतास्थापना, ग्रह-वास्तु शांतता आदी धार्मिक विधी विधिवत पार पडले. गुहेवर विशेष पूजा संपन्न झाली. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
       या दत्तयागासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे, गुजरात आदी भागांतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी व सायंकाळी झालेल्या भजन व भक्तिसंगीताच्या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी निघालेल्या पालखी सोहळ्यालाही मोठी उपस्थिती लाभली.
       दरम्यान, सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी महापूजा, पूर्णाहुती, महाआरती व महाप्रसादाने या श्री मन्युसूक्त दत्तयाग व गुरुप्रतिपदा उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पावन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माणगाव दत्त मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!