बदली रद्द न झाल्यास शाळा बंद आंदोलनाचा इशारा
मुख्याध्यापक संजय बगळे यांना याच शाळेत ठेवण्याची आग्रही मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा आंबडपाल येथील मुख्याध्यापक संजय बगळे यांची बदली रद्द करून त्यांना तात्काळ याच शाळेत हजर करून घ्यावे, या मागणीसाठी शनिवारी पालक व ग्रामस्थ एकवटले. शिक्षण विभागाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
संजय बगळे यांच्या कार्यकाळात शाळेने जिल्हा व राज्यस्तरावर नावलौकिक मिळविल्याने त्यांना याच शाळेत ठेवण्याची आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच महेश मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश तानीवडे, उपाध्यक्ष भगवान सावंत, उपसरपंच धिरेंद्र (गोट्या) चव्हाण, पोलिस पाटील सचिन सावंत, पालक तानाजी सावंत, संतोष सावंत, सूर्यकांत सावंत, दिनकर सावंत आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.









