ठळक घडामोडी

कसाल येथील दहावी परीक्षा केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ तालुक्यातील कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल, कसाल या दहावी परीक्षा केंद्राला भेट दिली. इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना त्यांनी केंद्राची पाहणी करून परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली.
सध्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असून ती सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रावरील व्यवस्था, सुरक्षेची उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी जाणून घेतली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी कसाल अशोक चव्हाण तसेच ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत कांबळे उपस्थित होते.

error: Content is protected !!