उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली. तहसीलदार कार्यालयात उमेदवार व प्रतिनिधी यांची गर्दी झाल्याचे चित्र आहे. तहसीलदार कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









