
ग्रामस्थांशी साधला संवाद; ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात;
हुमरमळा येथे अमरसेन सावंत-नारायण मांजरेकर यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली असून प्रचाराला वेग आला आहे. या प्रचारात आज मुंबईचे आमदार महेश सावंत यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. अमरसेन सावंत व नारायण मांजरेकर यांच्या प्रचारार्थ हुमरमळा (अणाव) येथे प्रचार फेरी काढण्यात आली. या वेळी आमदार महेश सावंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन केले.
ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फौज जिल्हा परिषद उमेदवार अमरसेन सावंत, पंचायत समिती उमेदवार नारायण उर्फ आप्पा मांजरेकर व चित्रा पावसकर यांच्या प्रचारात उतरली आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार महेश सावंत यांनी हुमरमळा येथे भेट देत प्रचारात सहभाग घेतली. ग्रामस्थांशी संवाद साधत, ठाकरे शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत प्रचार अधिक प्रभावी कसा करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला मतदारसंघ प्रचार प्रमुख जयभारत पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, हुमरमळा सरपंच समीर पालव, संदीप म्हाडेश्वर, राजेश टंगसाळी, राजू पवार, बबन चव्हाण, शुभम पालव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारसंघात घराघरांत जाऊन प्रचार करण्यात येत असून, विकासाचा अजेंडा व ठाकरे शिवसेनेचा वचननामा थेट मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे.








