ठळक घडामोडी

पिंगुळी जि.प. मतदारसंघात महायुतीचा झंझावाती प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आमचा विजय निश्चित – अजय आकेरकर

अजय आकेरकर, साधना माडये यांची पिंगुळीत प्रचार फेरी; डोअर टू डोअर प्रचारावर भर

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून, संपूर्ण मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. महायुतीकडून जिल्हा परिषदेचे उमेदवार अजय आकेरकर, पंचायत समितीच्या उमेदवार साधना माडये आणि मिलिंद नाईक यांच्या प्रचारार्थ डोअर टू डोअर प्रचारावर भर देण्यात येत आहे.
       भाजपासह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सक्रिय सहभागी झाले असून, मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार फेर्‍या काढल्या जात आहेत. प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास जिल्हा परिषदेचे उमेदवार अजय आकेरकर यांनी व्यक्त केला.
       महायुतीकडून पिंगुळीचे विद्यमान सरपंच असलेले अजय आकेरकर यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क असून, सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्यासोबत अनुभवी कार्यकर्त्यांची मजबूत फळी प्रचारात उतरली असल्याने महायुतीच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. आज पिंगुळी शेटकरवाडी येथील श्री देव महापुरुष मंदिरात नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर परिसरात झंझावाती प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
       प्रचारादरम्यान विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडण्यात येत असून, घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. गेले काही दिवस मतदारसंघात प्रचार अधिक तीव्र झाला असून, महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा प्रतिसाद पाहता विजयाबाबत आम्ही आश्वस्त असल्याचेही अजय आकेरकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!