ठळक घडामोडी

वैभववाडीत अरुंद रस्त्यामुळे एसटी बस गटारात कलंडली

मोठा अनर्थ टळला; प्रवासी सुखरूप

रस्ता रुंदीकरणाची ग्रामस्थांची मागणी

वैभववाडी : प्रतिनिधी
   वैभववाडी तालुक्यातील आखवणे–गुरववाडी मार्गावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अरुंद रस्त्यामुळे कणकवली–मौदे एसटी बस गटारात कलंडली. समोरून येणाऱ्या मानव विकास एसटी बसला साईड देताना हा अपघात घडला.
   सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस गटारातून बाहेर काढली.
    दरम्यान, मौदे डाळकोंड ते आखवणे गुरववाडी दरम्यानचा रस्ता अरुंद व खड्डेमय असून यापूर्वीही अपघात घडले आहेत. या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व नूतनीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!