ठळक घडामोडी

कणकवलीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या पिशवीतील १ लाखांची रोकड लंपास

बाजारात हातचालाखीचा प्रकार; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

सीसीटीव्ही तपासूनही चोरटा निष्पन्न नाही

कणकवली : प्रतिनिधी
     कणकवली – शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत शंकर साटम (वय ७६) यांच्या पिशवीतील एक लाख रुपयांची रोकड अज्ञाताने हातचालाखीने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कणकवली बाजारपेठेत घडली.
    साटम यांनी एका पतसंस्थेतून खात्यावरून एक लाख रुपये काढून ते पिशवीत ठेवले होते. पिशवीची चैन तुटलेली असल्याने हातपिन खरेदी केले. त्यानंतर टॉवेल खरेदी केले. त्याचदरम्यान अज्ञात चोरट्याने दोन बंडलमध्ये असलेली ५०० रुपयांची नोटांची रोकड लंपास केली. काही वेळानंतर पैसे नसल्याचे लक्षात येताच साटम यांना धक्का बसला.
   घटनेनंतर त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटा स्पष्ट दिसून आला नाही. शुक्रवारी साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

error: Content is protected !!