ठळक घडामोडी

सिंधुदुर्गात मद्य तस्करीचा पर्दाफाश!

बांदा तापसणी नाक्यावर ११.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईजच्या इन्सुली पथकाची मोठी कारवाई

सावंतवाडी : प्रतिनिधी 
       मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाका इन्सुलीच्या पथकाने मोठी कारवाई करत ११.६८ लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.ही कारवाई २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता करण्यात आली.
            गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात MH-10-DT-5307 क्रमांकाच्या चारचाकी वाहनास थांबवून तपासणी केली असता, वाहनाच्या डिकीत, सीटखाली, चोर कप्प्यांमध्ये आणि सिमेंटच्या विटांखाली लपवलेले गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे ३६ बॉक्स सापडले. 
      या कारवाईत प्रविण महादेव बोराडे (वय ३०, रा. बोरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) या वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले असून, जप्त मुद्देमालात ३.६८ लाख रूपये किंमतीचे मद्य व ८ लाख रूपये किंमतीचे वाहन यांचा समावेश आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुरे, विभागीय उपआयुक्त विजय चिघळेकर, आणि अधीक्षक किरण रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, रंजीत शिर्के, निलेश चाळके, दिपक वायदे, सागर सुभेदार, अभिषेक खत्री, आणि सातीर शोगुले यांच्या पथकाने केली.सदर गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत नोंदविण्यात आला असून, पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत, अशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

error: Content is protected !!