ठळक घडामोडी

कुडाळात जि.प.चे ५ अर्ज बाद; वर्षा कुडाळकरांचे तेंडोली–पिंगुळीतील दोन्ही अर्ज अवैध!

जि.प.–पं.स. नामनिर्देशन छाननी पूर्ण; ११२ पैकी १०७ अर्ज वैध

जि.प.चे ४३ व पं.स.चे सर्व ६४ अर्ज वैध; वर्षा कुडाळकरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. यावेळी जि.प.च्या प्राप्त 48 पैकी 43 उमेदवारी अर्ज वैध तर 5 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. पं.स.च्या प्राप्त 64 पैकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. जि.प.व पं.स. मिळून प्राप्त 112 पैकी 107 अर्ज वैध ठरले. जि.प. च्या अवैध अर्जात वर्षा कुडाळकर (अपक्ष) यांचे तेंडोली व पिंगुळी दोन्ही अर्ज अवैध ठरले. पिंगुळी जि.प. मतदारसंघातील अंकुश रामा जाधव (वंचित बहुजन आघाडी) व कल्पेश काशिनाथ मसके (अपक्ष) आणि पावशी जि.प. मतदारसंघातील रामदास गोपाळ ठाकूर (अपक्ष) यांचे अर्ज अवैध ठरल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिली.

     छाननी प्रक्रिये दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन पाटील, संजय गवस, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.
   महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या वर्षा कुडाळकर यांनी शिंदे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत पिंगुळी व तेंडोली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांचे दोन्ही अर्ज बाद ठरल्याने आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!