ठळक घडामोडी

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांचा देवगड येथे सत्कार

देवगड : प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी निवड झालेले देवगडचे सुपूत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांचा येथील शासकीय विश्रामगृहात तेली समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अॅड. जामसंडेकर यांची न्यायाधीशपदी झालेली नवनियुक्ती ही सिंधुदुर्गसह देवगड तालुका तेली समाज बांधवांसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. प्रामाणिकपणा, न्यायनिष्ठा आणि कायद्यावरील सखोल ज्ञानामुळेच त्यांनी हा मानाचा पदभार प्राप्त केला आहे, अशी प्रतिक्रिया तेली समाज बांधवांनी व्यक्त केल्या.

येथील शासकीय विश्रामगृहात न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या सन्मान कार्यक्रमात देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीचे संचालक, सल्लागार मंडळ, महिला आघाडी सदस्य तसेच तेली समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी न्या. जामसंडेकर यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, अभिनंदन पत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. न्या. जामसंडेकर यांचा सन्मान हा देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान असून तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी अशोक तेली, जनार्दन तेली, एकनाथ तेली, तुकाराम तेली, रवींद्र हिंदळेकर, प्रमोद शेठ, राजेंद्र हिंदळेकर, विजय शेट्ये, दत्ताराम शेलार, मधुकर कुवळेकर, पुंडलिक शेट्ये, शुभांगी तेली, बाळकृष्ण हिंदळेकर, नरहरी तेली, विजय तेली, समीर हिंदळेकर, महेश मोंडकर, नीतेश तेली, राजेंद्र रहाटे, महेश पेटकर, प्रदीप वाडेकर, प्रभाकर तेली, प्रशांत वाडेकर, दीक्षा हिंदळेकर, अंकिता वाडेकर, सुधीर ताम्हणकर, रविकांत चांदोस्कर, प्रमोद आंबेरकर तसेच इतर महिला आघाडी सदस्य, समाज बांधव, संपर्कप्रमुख उपस्थित होते.

error: Content is protected !!