कुडाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच ती मनाला हादरवून टाकणारी ठरली. माझ्यावतीने, माझ्या कुटुंबीयांच्या व माझ्या पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अजित पवार यांच्यासोबत मला जवळपास दहा वर्षे विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. या काळात अनेक वेळा त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्या सहवासात राहण्याचा योग आला. ते प्रत्येक क्षण कामासाठी झटणारे नेतृत्व होते. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांची दिनचर्या सुरू होत असे. सकाळी सहा वाजता होणाऱ्या त्यांच्या बैठकींना आम्ही अनेक वेळा उपस्थित राहिलो आहोत. त्यांचे निधन ही धक्कादायक बातमी असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करतो.
– वैभव नाईक
माजी आमदार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)









