भंगसाळ नदीकाठची संरक्षक भिंत वादात; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना विचारला जाब

कुडाळ : प्रतिनिधी
पावशी शेलटेवाडी येथे भंगसाळ नदीकाठावर सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत शनिवारी स्थानिक ग्रामस्थांनी काम बंद पाडले. भिंतीचा पाया मजबूत नसल्यास पावसाळ्यात धोका निर्माण होईल, असा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला.
घटनास्थळी संबंधित खात्याचे अधिकारी दाखल झाले. त्यांना ग्रामस्थांनी याबाबत जाब विचारत, अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार काम करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीनंतर झालेल्या कामाची मोजमाप व गुणवत्ता तपासणी केली जाईल, तोपर्यंत काम बंद ठेवले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी पावशीचे सरपंच लक्ष्मीकांत (कांता) तेली, प्रसाद शेलटे, उमेश शेलटे, दर्शन शेलटे, किशोर शेलटे, अवि शेलटे, प्रदीप शेलटे, संदेश शेलटे, प्रवीण शेलटे, रोशन परब, तुषार शेलटे, प्रथमेश शेलटे, नारायण शेलटे, राकेश शेलटे, अक्षय शेलटे, ओंकार शेलटे, स्वरूप वाळके, प्रकाश पावसकर, बळीराम शेलटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.







