ठळक घडामोडी

दोडामार्ग तालुक्यात विहिरीत पडून जंगली गवारेड्याचा मृत्यू!

माटणे वरचीवाडी येथे कठडा नसलेल्या विहिरीत गवारेडा पडला!

शेतातील विहिरीत आढळला जंगली गवारेड्याचा मृतदेह!

दोडामार्ग : प्रतिनिधी
     जंगलातून शेतात आलेल्या एका भल्या मोठ्या जंगली गवारेड्याचा कठडा नसलेल्या शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ही घटना दोडामार्ग तालुक्यातील माटणे वरचीवाडी परिसरात घडली.
   सखाराम हरिश्चंद्र गवस हे आपल्या काजू बागेत साफसफाईसाठी गेले असता विहिरीत गवारेड्याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ ही बाब पोलीस पाटील यांना कळवली. त्यानंतर दोडामार्ग वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत सदर गवारेडा तीन ते चार दिवसांपूर्वी विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याचे आढळून आले. विहिरीत पाणी असल्याने मृत गवारेड्याला बाहेर काढण्याचे काम अडचणीचे ठरत होते.
    दरम्यान, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मृत गवारेड्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. माटणे वरचीवाडी येथील ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनीही या कामात सहकार्य केले.

error: Content is protected !!