ठळक घडामोडी

स्पष्टवक्तेपणा व निर्णयक्षम नेतृत्व गमावले – आर. के. सावंत

कुडाळ : प्रतिनिधी
          महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर खोलवर ठसा उमटवणारे, लहान-थोर सर्वांचे दादा म्हणून ओळखले जाणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले, ही बाब अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, निर्भीड, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेता गमावला आहे.राजकारणात पदार्पण केल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही.
          जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणे, प्रशासनावर वचक ठेवत निर्णय घेणे आणि विकासाला गती देणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे सामान्य माणसाचा विचार आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची तळमळ होती.आज त्यांच्या जाण्याने सार्वजनिक व राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. असे नेतृत्व पुन्हा होणे दुर्मीळ आहे. महाराष्ट्राने एक आधारस्तंभ गमावला असून, ही जखम फार काळ बोचत राहील.
      या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. त्यांना हे असह्य दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– आर. के. सावंत
माजी उपसभापती, कुडाळ

error: Content is protected !!