ठळक घडामोडी

अणसूर ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

वेंगुर्ला : प्रतिनिधी
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत अणसूर येथे सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत अणसूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यावेळी 30 जणांनी रक्तदान केले.
    यावेळी ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे,
सदस्य सीमा गावडे, सुधाकर गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, तसेच सुनिल गावडे, मंगेश गावडे आणि रामचंद्र गावडे आदी उपस्थित होते. रक्त संकलनाचे संपूर्ण नियोजन एस एस पी एम ब्लड बँक, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले होते. ब्लड बँकचे इन्चार्ज श्री. यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे शिबिराचे व्यवस्थापन केले.
ग्रामपंचायत अणसूरने घेतलेला हा पुढाकार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्देशाला साजेसा असून, या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य सेवा जपण्याचा संदेश देण्यात आला.

error: Content is protected !!