ठळक घडामोडी

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस; पावशी विभागात विविध सामाजिक उपक्रम!

विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन

सर्वांनी सहभागी होण्याचे जि.प.सदस्य दादा साईल यांचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मंगळवारी १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पावशीचे जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांनी केले आहे.
     पणदूर येथील शिवसेना शाखा कार्यालयात पावशी विभागाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभाग प्रमुख नागेश परब यांनी मार्गदर्शन करताना आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक गावात भेट देऊन शाखाप्रमुख नियुक्ती व शाखा बांधणी पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. तसेच मंजूर झालेल्या विकासकामांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, विभाग प्रमुख नागेश परब, उपतालुका प्रमुख अरुण सावंत, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, महिला तालुकाप्रमुख वैशाली पावसकर, महिला विभाग प्रमुख मृणाल परब, उपविभाग प्रमुख गजानन कुलकर्णी, सदा अणावकर, कुबल गुरुजी, शेखर गोसावी तसेच सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पणदूर शाखाप्रमुख बबन निर्गुण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
     वाढदिवसानिमित्त पावशी विभागातील सर्व ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये अभिषेक व विशेष पूजनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे. युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार असून विभागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे.
    पणदूर येथे क्रिकेट स्पर्धा!
    निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथे २०, २१ आणि २२ मार्च रोजी  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये पावशी विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांनी केले.

error: Content is protected !!