ठळक घडामोडी

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

“बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी” विषयावर २१ ते २३ जानेवारी दरम्यान प्रशिक्षण

अनुभवी तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभणार

कुडाळ : प्रतिनिधी
      बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज, कुडाळ एमआयडीसी येथे दि. २१, २२ व २३ जानेवारी २०२६ रोजी “बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी” या विषयावर तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
     या कार्यशाळेत नर्सिंग क्षेत्रातील संशोधनाची मूलभूत संकल्पना, संशोधनाची पद्धत, विविध प्रकारची संशोधने, त्यांची अंमलबजावणी व समाजासाठी होणारा उपयोग याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत चालणाऱ्या या कार्यशाळेत व्याख्यानांसह चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, लोटे येथील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. मिलिंद काळे, तसेच प्रा. महंतेश कारगी, प्रा. धनंजय डोंगरे, प्रा. शिवप्रसाद हालेमनी, प्रा. दिव्या मोहनन हे नर्सिंग व संशोधन क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ व्याख्याते प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. या राज्यस्तरीय कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून नर्सिंग प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असून, संशोधनविषयक ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. तरी नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी व प्रशिक्षणार्थींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्पना भंडारी तसेच संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!