ठळक घडामोडी

कुडाळ येथे विभागस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा उत्साहात!

कुडाळ : प्रतिनिधी
    क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळ यांच्या संयुक्त आयोजनाखाली विभागस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच कुडाळ येथे करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ मराठा मंडळ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष का. आ. सामंत, कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक विपिन वराडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसळकर, राजेश निर्गुण, कुडाळ तालुका क्रीडा समन्वयक विजय मयेकर, क्रीडा शिक्षक वैभव कोंडसकर, सिद्धार्थ बावकर, रामचंद्र खाकर तसेच या स्पर्धेसाठी नियुक्त सर्व पंच उपस्थित होते. कोल्हापूर विभागातील पाचही जिल्ह्यांतील क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या विभागस्तरीय स्पर्धेसाठी मराठा समाज हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा समाज हॉलचे संचालक व क. म. शि. प्र. मंडळाचे सहकार्यवाह महेंद्र गवस यांच्या योगदानामुळे स्पर्धेचे आयोजन अधिक सुलभ झाले. स्पर्धेच्या नियोजनाबद्दल उपस्थित क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व पालकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांना यशस्वी कामगिरीसाठी प्रोत्साहित केले.

error: Content is protected !!