ठळक घडामोडी

कचरा टाकल्यास होणार कारवाई!

वायरी ग्रामपंचायतीचा इशारा

मालवण : प्रतिनिधी
        वायरी भूतनाथ किनारपट्टीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. या नंतर ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.
        येथील किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात प्लास्टिक कचरा, बॉटल्स, टाकावू अन्नपदार्थ टाकण्यात येत होते. यामुळे किनारपट्टीचे सौंदर्य बिघडून परिसरात स्वच्छता पसरली होती.
      नागरिकांच्या मागणी नंतर वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने किनारपट्टीवरील कचरा सफाई केली आहे. याठिकाणी ग्रामपंचायतीकडून सूचनेचा फलक लावण्यात आला आहे. यानुसार परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. कचरा टाकल्यास कचरा टाकणाऱ्यावर ५००  रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तर कचरा करणाऱ्या व्यक्ती निदर्शनास आणणाऱ्याला २०० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सरपंच भगवान लुडबे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!