

मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय ‘मैत्री क्रीडा चषक’ क्रिकेट स्पर्धा नुकत्याच बोर्डिंग ग्राउंड, मालवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. “एक दिवस स्वतःसाठी, आरोग्य व आनंदासाठी” या संकल्पनेतून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत मालवण तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सामने लिग पद्धतीने चार गटांत खेळविण्यात आले. इलेव्हन फायटर्स (संघनायक : महेश भाट), मार्गदर्शक मास्टर्स (संघनायक : महेंद्र वारंग),
मास्टर ब्लास्टर (संघनायक : शैलेश मुळीक)
आणि मास्टर माईंड ११ (संघनायक : तुषार सकपाळ) या संघांमध्ये सामने रंगले.या स्पर्धेचे उद्घाटन मालवण तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक संजय जाधव (वायंगणी हायस्कूल) यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत पाटील, काळसे हायस्कूलचे मुख्याध्यापक अविनाश परब, आडवली हायस्कूलचे मुख्याध्यापक तुषार सकपाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गांवकर यांनी केले, तर सामन्यांचे समालोचन शिंदे सर यांनी केले.
अंतिम निकालानुसार प्रथम क्रमांक — मास्टर ब्लास्टर, द्वितीय क्रमांक — मार्गदर्शक मास्टर्स,,तृतीय क्रमांक — मास्टर माईंड ११,तर चतुर्थ क्रमांक — इलेव्हन फायटर्स संघाने पटकावला. या स्पर्धेमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये खेळाची आवड, आरोग्याबाबत जागरूकता आणि परस्पर स्नेहभावना अधिक दृढ झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.








