ठळक घडामोडी

कुडाळ येथे आग; २ दुचाकी जळून खाक!

नागरीकांची तारांबळ; प्रशासकीय यंत्रणेची पळापळ

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या आंब्याच्या झाडाखाली टाकाऊ साहित्याला गुरूवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आग लागली. भर उन्हात ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात आली. कुडाळ पोलीसांसह अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. नगरसेवकांसह नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहकार्य केले. तेथील झाडाखाली नजिकच्या गॅरेज मधील दोन नादुरुस्त दुचाकी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्या आगीत जळून खाक झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.

error: Content is protected !!