ठळक घडामोडी

कुडाळात खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य व रक्तदान शिबिर!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून ८ एप्रिलला आयोजन

नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाची सुविधाही उपलब्ध

कुडाळ : प्रतिनिधी
        भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून महा आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. बुधवार, दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे हि शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
       या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध मोफत तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये कोलेस्ट्रॉल तपासणी (उपाशीपोटी), मधुमेहींसाठी HBA1C तपासणी, कॅल्शियम तपासणी, महिलांसाठी थायरॉईड तपासणी तसेच ECG, शुगर व ब्लडप्रेशर चेकअप व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे. तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन शिंदे शिवसेनेचे कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक दत्तात्रय गावडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी चेतन पडते (मो. ७२१८२४२९९९) व आबा घडाम (मो. ९४०४१६६८६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!