मुंबई – गोवा महामार्गावर दुचाकीची कारला धडक
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर दुचाकी आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजताच्या सुमारास झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार कुडाळहून आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी महामार्गालगत उभ्या असलेल्या इनोव्हा गाडीला दुचाकीची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.









