नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कुडाळ येथील श्री वासुदेवानंद सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून वैभववाडी येथील संजय सावंत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कार्यवाह म्हणून तरळे येथील राजू जठार, सहकार्यवाह म्हणून कुडाळ येथील राजन नाईक यांची निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी बागायतचे दीपक भोगले, सावंतवाडीचे पुंडलिक दळवी व कुडाळचे अवधूत शिरसाट यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी वेंगुर्ले येथील नंदन वेंगुर्लेकर यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रसाद पारकर, श्रीपाद चोडणकर, प्रल्हाद पावले, संजय भोगटे, दीपक बेलवलकर, गणेश बोर्डेकर, हर्षल बांदेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, नंदकिशोर टोपले, सुधीर साटम, अश्विन पांगम आणि दिगंबर तांडेल यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत सदस्य म्हणून सौ. तृप्ती पारकर, अरविंद नेवाळकर, श्रीराम शिरसाट आणि निलेश धडाम यांचा समावेश करण्यात आला. ही संपूर्ण निवड प्रक्रिया अनिल सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नितीन वाळके यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीमुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.









