ठळक घडामोडी

आंब्रड जि. प. गटात ठाकरे–शिंदे शिवसेनेत थेट लढत निश्चित!

कुडाळ तालुक्यात जि.प.च्या तीन अपक्ष उमेदवारांची माघार

कुडाळ : प्रतिनिधी
       जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध गटांतील तीन अपक्ष उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
     यामध्ये जि. प. गट क्रमांक २५ – आंब्रड येथून अपक्ष उमेदवार सोनाली पांडुरंग सावंत, जि. प. गट क्रमांक २८ – पावशी येथून अपक्ष उमेदवार भिकाजी (बाळा) कोरगावकर तसेच जि. प. गट क्रमांक ३१ – पिंगुळी येथून अपक्ष उमेदवार कल्पेश केशव म्हापसेकर (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या मागे घेतले आहेत. याबाबतची माहीती कुडाळ निवडणूक विभागातून देण्यात आली आहे.
दरम्यान आंब्रड जि.प. मतदारसंघात तीन उमेदवारां पैकी एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार शेजल शेखर परब आणि शिंदे शिवसेनेच्या उमेदवार दीपलक्ष्मी सुशांत पडते यांच्यात थेट लढत होण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

error: Content is protected !!